
Railway ALP Recruitment 2026 (रेल्वे ALP भरती २०२६) ची एक सुवर्णसंधी आली आहे. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने CEN ०१/२०२६ अंतर्गत असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी ११,१२७ जागांची घोषणा केली आहे. रेल्वे ALP Recruitment 2026 ही १०वी पास तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे.
रेल्वे भर्ती २०२६ मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ मे २०२६ पासून सुरू झाली आहे. या भरतीतून भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये स्थिर सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध आहे.
| विभाग | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) | असिस्टंट लोको पायलट (ALP) | ११,१२७ |
एकूण जागांचा तपशील : Vacancy Details
Railway ALP Recruitment 2026 अंतर्गत एकूण ११,१२७ जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. या जागा विविध रेल्वे झोन आणि RRB मध्ये वितरित केल्या गेल्या आहेत. UR, SC, ST, OBC, EWS श्रेणीनुसार आरक्षण लागू आहे.
Ex-Servicemen साठी देखील आरक्षण उपलब्ध आहे. ही भरती भारतीय रेल्वेच्या विविध उत्पादन युनिट्स आणि झोनमध्ये होणार आहे.
शैक्षणिक पात्रता : Educational Qualification
उमेदवार १०वी उत्तीर्ण असण्यासोबतच खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे
- मॅट्रिक/SSLC + NCVT/SCVT कडून मान्यताप्राप्त ITI (Fitter, Electrician, Electronics Mechanic, Diesel Mechanic इ. ट्रेड्स).
- मॅट्रिक + संबंधित ट्रेडमध्ये Act Apprenticeship पूर्ण केलेले.
- मॅट्रिक + मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा.
- संबंधित इंजिनिअरिंग विषयात BE/B.Tech डिग्री.
वयोमर्यादा (Age Limit)
१ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे.
आरक्षणानुसार वय सवलत उपलब्ध: SC/ST – ५ वर्षे, OBC-NCL – ३ वर्षे,
PwD – १० वर्षे अतिरिक्त इ. नियम लागू.
अर्ज शुल्क : Application Fees
- सामान्य (UR/OBC/EWS): ₹५००
- SC/ST/PwD/Female/Ex-Servicemen/EBC: ₹२५०
CBT-१ परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना फी परत केली जाईल. - (UR/OBC/EWS साठी ₹४००, इतरांसाठी ₹२५०).
- फी ऑनलाइन पद्धतीने भरावी.
महत्त्वाच्या तारखा : Important Dates
- नोटिफिकेशन जारी: १४ मे २०२६
- ऑनलाइन अर्ज सुरू: १५ मे २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ जून २०२६
- फी भरण्याची शेवटची तारीख: १६ जून २०२६
- अर्ज सुधारणा विंडो: १७ ते २६ जून २०२६
- परीक्षा तारखा: नंतर जाहीर करण्यात येतील.
महत्त्वाच्या लिंक्स
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : Apply Online
अधिकृत नोटिफिकेशन PDF : Notification
रेल्वे भर्ती बोर्ड अधिकृत वेबसाईट (Official Website): rrbcdg.gov.in
निवड प्रक्रिया
Selection Process Railway ALP Recruitment 2026 ची निवड प्रक्रिया खालील टप्प्यांत होईल:
- CBT-१ (स्क्रीनिंग टेस्ट)
- CBT-२ (Part A + Part B)
- Computer Based Aptitude Test (CBAT)
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV)
- मेडिकल एक्झामिनेशन (A-1 स्टँडर्ड)
पगार आणि भत्ते (Salary Details)
निवड झालेल्या उमेदवारांना Pay Level-2 नुसार प्रारंभिक पगार ₹१९,९०० मिळेल (७व्या वेतन आयोगानुसार). याशिवाय DA, HRA, TA आणि इतर भत्ते मिळतील. दीर्घकाळात पगार आणि सुविधा आकर्षक आहेत.
अर्ज कसा करावा? (How to Apply)
(Step by Step) Railway Bharti 2026 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे:
- अधिकृत वेबसाइट https://www.rrbapply.gov.in/ वर जा.
- “Apply” बटणावर क्लिक करा आणि नवीन खाते तयार करा (किंवा लॉगिन करा).
- व्यक्तिगत, शैक्षणिक तपशील, RRB आणि झोनची निवड करा.
- फोटो, सही आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करा.
- अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरून Preview घ्या.
- अर्ज फी ऑनलाइन भरा.
- फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.
टीप: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. आपल्या मित्रांसोबत ही माहिती नक्की शेअर करा!