CSIR UGC NET 2026 जर तुमचे विज्ञान (Science) शाखेतून पोस्ट ग्रॅज्युएशन (M.Sc.) झाले असेल आणि तुम्ही प्रोफेसर बनण्याचे किंवा रिसर्च (PhD) करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) Joint CSIR-UGC NET जून २०२६ परीक्षेची अधिकृत अधिसूचना (Notification) प्रसिद्ध केली आहे.
या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता, सिलॅबस, महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षेचे स्वरूप याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
| पद क्रमांक (Post No.) | पदाचे नाव (Post Name) | एकूण जागा (Total Vacancies) |
| १ | कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF – Junior Research Fellowship) | — |
| २ | सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) & Ph.D. प्रवेश | — |
🎓 शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)
१. एम.एस्सी (M.Sc.) किंवा समकक्ष पदवी, Integrated BS-MS, B.Tech, BE, B.Pharma किंवा MBBS.
२. गुणांची टक्केवारी: जनरल, ईडब्ल्यूएस (EWS) आणि ओबीसी (OBC) उमेदवारांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किमान ५५% गुण असणे अनिवार्य आहे.
3. एससी (SC), एसटी (ST), तृतीय पंथी आणि दिव्यांग (PwD) उमेदवारांसाठी ५०% गुणांची अट आहे.
4. अपेक्षित निकाल (Result Awaited): जे उमेदवार सध्या एम.एस्सी. च्या अंतिम वर्षात (Final Year) आहेत, ते सुद्धा या परीक्षेसाठी तात्पुरता (Provisional) अर्ज करू शकतात.
📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात: २७ मे २०२६
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १९ जून २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत)
- ऑनलाईन फी भरण्याची अंतिम तारीख: २० जून २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत)
- अर्जात दुरुस्तीसाठी मुदत (Correction Window): २२ जून ते २३ जून २०२६
- परीक्षा दिनांक: १७ आणि १८ जुलै २०२६
⏳ वयोमर्यादा (Age Limit)
- JRF (Junior Research Fellowship): उमेदवाराचे वय १ जुलै २०२६ रोजी कमाल ३० वर्षे असावे. (SC/ST/OBC/महिला आणि दिव्यांग उमेदवारांना नियमांनुसार ५ वर्षांपर्यंतची सूट मिळेल).
- Assistant Professor आणि PhD प्रवेश: यासाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा (No Upper Age Limit) नाही.
💸 अर्ज शुल्क (Application Fee)
- सामान्य प्रवर्ग (General): ₹१,१५०/–
- EWS आणि OBC (NCL): ₹६००/-
- SC / ST / दिव्यांग (PwD) / तृतीय पंथी: ₹३२५/-
🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
| तपशील (Description) | लिंक (Link) |
| 🌐 ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | Apply Online |
| 📄 अधिकृत जाहिरात PDF (Official Notification) | Notification |
| 🏫 अधिकृत वेबसाईट (Official Website) | CSIR HRDG Website |
🧪 परीक्षा एकूण ५ विषयांसाठी होणार (Subjects Covered)
CSIR NET परीक्षा प्रामुख्याने विज्ञान शाखेतील खालील ५ विषयांसाठी घेतली जाते: १. केमिकल सायन्सेस (Chemical Sciences)
२. अर्थ, ॲटमॉस्फेरिक, ओशन अँड प्लॅनेटरी सायन्सेस (Earth, Atmospheric, Ocean & Planetary Sciences)
३. लाईफ सायन्सेस (Life Sciences)
४. मॅथेमॅटिकल सायन्सेस (Mathematical Sciences)
५. फिजिकल सायन्सेस (Physical Sciences)
📝 परीक्षेचे स्वरूप आणि सिलॅबस (Exam Pattern & Syllabus)
ही परीक्षा CBT (Computer Based Test) म्हणजेच संगणकावर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल.
प्रश्नपत्रिका एकूण २०० गुणांची असून ती सोडवण्यासाठी ३ तास (१८० मिनिटे) मिळतील. प्रश्नपत्रिकेची भाषा हिंदी आणि इंग्रजी अशी दोन्ही असेल.
प्रश्नपत्रिका प्रामुख्याने तीन भागांमध्ये (Part A, B, C) विभागलेली असते:
- Part A (General Aptitude): हा भाग सर्व ५ विषयांसाठी कॉमन असतो. यामध्ये लॉजिकल रिझनिंग, जनरल ॲप्टिट्यूड, ग्राफिकल अनॅलिसिस आणि गणितीय क्षमतेवर आधारित २० प्रश्न विचारले जातात (त्यापैकी १५ सोडवणे गरजेचे असते).
- Part B (Subject-Related MCQs): यामध्ये तुम्ही निवडलेल्या मुख्य विषयावर आधारित थेट आणि संकल्पनात्मक (Conceptual) बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.
- Part C (Higher-Order Questions): या भागामध्ये वैज्ञानिक संकल्पनांचे सखोल ज्ञान आणि त्यांचे उपयोजन (Application) तपासणारे उच्च काठिण्यपातळीचे प्रश्न असतात. या भागात सर्वाधिक गुण असतात.
⚠️ महत्त्वाची नोंद: या परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) लागू असते. त्यामुळे चुकीच्या उत्तरासाठी गुण कापले जातील, हे लक्षात ठेवूनच प्रश्न सोडवावेत. सविस्तर सिलॅबस पाहण्यासाठी तुम्हीCSIR HRDGच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
💻 अर्ज कसा करावा?
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी NTA CSIR NET या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे. अर्ज करताना वैध ईमेल आयडी, मोबाईल नंबर, फोटो, स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे जवळ ठेवावीत. शेवटच्या क्षणी होणारी सर्व्हरची गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांनी मुदतीपूर्वीच आपला अर्ज सादर करावा.