
MPSC Group B Hall Ticket/Admit Card 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात येणाऱ्या गट-ब (Group B) संयुक्त पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार आता आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.
एमपीएससी ग्रुप-बी ची पूर्व परीक्षा १४ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विविध केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांकडे हॉल तिकीट असणे अनिवार्य आहे.
MPSC Group B हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे? (Step-by-Step Process)
उमेदवार खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात:
सर्वात आधी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला mpsc.gov.in किंवा mpsconline.gov.in भेट द्या.
होमपेजवर ‘Login’ सेक्शन निवडा.
आता तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर, तुमच्या डॅशबोर्डवरील ‘My Account’ या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर ‘View Form’ वर क्लिक करा.
आता तुम्हाला उजव्या बाजूला ‘प्रवेशपत्र (Hall Ticket)‘ चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करा.
हॉल तिकीट डाउनलोड झाल्यावर परीक्षा दिवसासाठी त्याची A4 साईज पेपरवर प्रिंटआऊट काढून घ्या.
हॉल तिकीटवर ‘या’ गोष्टी आवर्जून तपासा:
- उमेदवाराचे नाव आणि रोल नंबर (Roll Number)
- परीक्षा केंद्राचे नाव आणि संपूर्ण पत्ता
- परीक्षेची तारीख आणि रिपोर्टिंग वेळ (Reporting Time)
- उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी
- परीक्षेसाठीच्या महत्त्वाच्या सूचना
महत्त्वाची टीप: परीक्षा केंद्रावर जाताना उमेदवारांनी हॉल तिकीटच्या प्रिंटआउटसोबत स्वतःचे एक वैध ओळखपत्र (जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर आयडी) आणि त्याचा एक फोटोकॉपी (झेरॉक्स) सोबत ठेवणे आवश्यक आहे.
थेट लिंक (Direct Links):
- अधिकृत वेबसाईट: mpsc.gov.in
- लॉगिन आणि हॉल तिकीट डाउनलोड लिंक: mpsconline.gov.in