MPSC Group C Bharti 2026: गट-क संवर्गात २,६१९ जागांसाठी मेगा भरती जाहीर; येथे पहा सविस्तर माहिती

MPSC Group C Recruitment 2026

MPSC Group C Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) शासकीय नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. एमपीएससीने गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली असून, याद्वारे विविध विभागांतील एकूण २,६१९ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक यांसारखी संपूर्ण माहिती खाली सविस्तर देण्यात आली आहे.

MPSC गट-क भरती 2026 – एकूण पदे आणि तपशील

पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग, ऊर्जा व कामगार विभाग09
2तांत्रिक सहायकवित्त विभाग03
3कर सहायकवित्त विभाग282
4सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI)गृह विभाग461
5लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन व इतर विविध कार्यालयीन विभाग1864
एकूण पदे2619

🎓 शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 (उद्योग निरीक्षक): इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
  • पद क्र. 2 (तांत्रिक सहायक): कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  • पद क्र. 3 (कर सहायक): पदवीधर + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र. 4 (सहायक मोटार वाहन निरीक्षक): 10वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.
  • पद क्र. 5 (लिपिक-टंकलेखक): पदवीधर + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

📅 वयाची अट (01 ऑक्टोबर 2026 रोजी)

  • सर्वसाधारण (खुला प्रवर्ग): 18/19 ते 38 वर्षे (पदानुसार).
  • मागासवर्गीय/आ.दु.घ (EWS)/अनाथ: नियमानुसार 05 वर्षे सूट (43 वर्षांपर्यंत).

📍 नोकरीचे ठिकाण

  • संपूर्ण महाराष्ट्र.

💸 परीक्षा फी

  • खुला प्रवर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय/EWS/अनाथ: ₹294/-
  • माजी सैनिक: ₹44/-

💻 अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज फक्त Online पद्धतीनेच स्वीकारले जातील.

🗓️ महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज भरण्यास सुरुवात: 27 जून 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2026
  • पूर्व परीक्षा (CBT): 27 सप्टेंबर 2026 पासून पुढे

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

ऑनलाईन अर्ज (Apply Online): Apply Online

जाहिरात (Notification PDF): Download Notification

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top