भद्रावती तालुक्यात मोठी दुर्घटना: पचगाव येथे नाल्यात पडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तालुक्यातील पाचगाव येथे खेळत असताना नाल्यात पडल्याने दोन लहान मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पाचगाव गावावर शोककळा पसरली असून परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.


मृतक मुलांची नावे:

  • सानिध्य दुधणकर (वय ११ वर्षे)
  • कार्तिक सावसाकडे (वय १२ वर्षे)

खेळता खेळता घडली दुर्घटना

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सानिध्य आणि कार्तिक ही दोन्ही मुले घराबाहेर खेळत होती. पाचगाव येथील नाल्याला पावसाचे पाणी आलेले होते. खेळत असताना या मुलांचा अंदाज चुकल्याने किंवा पाय घसरल्याने ती अचानक नाल्यात पडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह असल्याने दोन्ही निष्पाप मुले स्वतःला सावरू शकली नाहीत आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  

टनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे दुधणकर आणि सावसाकडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  

पालकांना सतर्कतेचे आवाहन

पावसाळ्याचे दिवस असल्याने नदी, नाले आणि पाण्याचे साठे भरलेले असतात. लहान मुले खेळताना अनेकदा पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज घेऊ शकत नाहीत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावे आणि त्यांना अशा धोकादायक ठिकाणी खेळायला पाठवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top