BEL Recruitment 2026 (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२६): सरकारी नोकरीची सुवर्णसंधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या HLS & SCB SBU विभागात Field Operation Engineer (FOE) आणि Project Engineer-I या पदांच्या एकूण ५६ रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना ०८ जून २०२६ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
BEL Vacancy 2026: रिक्त पदांचा तपशील (Posts & Vacancy)
| पदाचे नाव (Post Name) | एकूण जागा (Total Vacancies) |
| Field Operation Engineer (FOE) | २५ |
| Project Engineer-I | ३१ |
| एकूण रिक्त जागा | ५६ |
BEL Eligibility Criteria: शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
पात्र शाखा: Electronics / ECE / E&TC / Telecommunication / Communication / Mechanical / Electrical / EEE / Computer Science / CSE / IT / Information Science / MCA.
Field Operation Engineer (FOE): संबंधित क्षेत्रात किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.Project Engineer-I: संबंधित क्षेत्रात किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
Age Limit: वय मर्यादा (दिनांक ०१-०६-२०२६ रोजी)
- Field Operation Engineer (FOE): कमाल ३5 वर्षे (UR / EWS उमेदवारांसाठी)
- Project Engineer-I: कमाल ३० वर्षे (UR / EWS उमेदवारांसाठी)
- OBC (Non-Creamy Layer): ३ वर्षे सूट (FOE: ३८ वर्षे | Project Engineer: ३३ वर्षे)
- SC / ST: ५ वर्षे सूट (FOE: ४० वर्षे | Project Engineer: ३५ वर्षे)
- PwBD (दिव्यांग): १० वर्षे सूट
BEL Bharti 2026: महत्त्वाच्या तारखा आणि संक्षिप्त तपशील
- अधिकृत जाहिरात क्रमांक: 383/HR/HLS&SCB/2025-26 (दिनांक: २० मे २०२६)
- अर्ज सुरू होण्याची तारीख: २० मे २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ जून २०२६
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- नोकरीचे ठिकाण (Posting): दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश (प्रोजेक्ट साईट्स). टीप: भारतभर फिरण्याची तयारी असावी.
BEL Salary 2026: पगार आणि मिळणारे भत्ते
- Field Operation Engineer (FOE): पहिल्या वर्षी ₹६०,०००/- प्रतिमहिना पगार मिळेल. दरवर्षी ₹५,०००/- ची वाढ होईल (कमाल ५ वर्षांपर्यंत). याशिवाय वैद्यकीय विमा आणि इतर भत्त्यांसाठी वार्षिक ₹२०,०००/- मिळतील.
- Project Engineer-I: पहिल्या वर्षी ₹४०,०००/- प्रतिमहिना पगार असेल. दरवर्षी ₹५,०००/- ची वाढ होईल (कमाल ४ वर्षांपर्यंत). तसेच इतर भत्त्यांसाठी वार्षिक ₹१२,०००/- मिळतील.
BEL Selection Process & Syllabus: निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम
उमेदवारांची निवड Pre-registered Walk-in Interview आणि लेखी परीक्षेद्वारे (Written Test) केली जाईल.
- लेखी परीक्षा (८५ गुण): यामध्ये संबंधित विषयांचे तांत्रिक ज्ञान (Discipline related technical subjects) जसे की Networking concepts, Data Centre operations, DBMS, Firewall, Routing/Switching protocols (OSPF, BGP, STP, VLAN), Linux basics, IP addressing आणि Security यावर वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. सोबतच General Awareness / Reasoning आणि Aptitude चा भाग असेल.
- मुलाखत (१५ गुण): लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची १५ गुणांची मुलाखत होईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे परीक्षा केंद्र व तारीख कळवली जाईल.
How to Apply: अर्ज फी आणि अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम उमेदवारांनी SBI Collect द्वारे परीक्षा फी भरणे आवश्यक आहे.
- अर्ज फी: FOE साठी ₹४५० + GST | Project Engineer साठी ₹४०० + GST (SC/ST/PwBD उमेदवारांसाठी फी पूर्णपणे माफ आहे).
- फी भरल्यानंतर BEL च्या अधिकृत संकेतस्थळावरील दिलेल्या Microsoft Form किंवा QR Code द्वारे ऑनलाइन अर्ज पूर्ण करावा.
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
- अधिकृत संकेतस्थळ: Bharat Electronics Limited Official Website
- भरती संदर्भातील माहितीसाठी: थेट BEL Careers ला भेट द्या.